[10/27, 9:33 AM] शिला ताई: उतारा👇🏻
कमल काल करजगावला गेली .तिथे तिचे काका काकू आणि कामना ताई राहायचे .कमलने तिथे कागदकाम शिकले .कागदापासून तिने कळी ,काटेजहाज ,कावळा ,विमान आकाशकंदिल अशा अनेक वस्तू बनवल्या .काका काकू आणि कामना ताईने कमलचे कौतुक केले .कमलला कागदी वस्तू पाहून कमालीचा आनंद झाला .
〰〰〰〰〰〰〰〰
प्रश्न👇🏻
👉🏿कमल कोणत्या गावाला गेली?
👉🏿कमल गावाला कधी गेली ?
👉🏿करजगावला कोण राहायचे ?
👉🏿कमलच्या ताईचे नाव काय आहे?
👉🏿कमलने कोणते काम शिकले?
👉🏿कमलने कागदाच्या कोणत्या वस्तू बनवल्या ?
👉🏿कमलला कधी आनंद झाला ?
〰〰〰〰〰〰〰〰
उतारालेखन
श्रीमती अम्भुरे शिला किशनराव
जि प प्रा शा पाटोदा (माव)
ता परतुर जि जालना
वर्ग =दुसरी (2रा)
[10/27, 9:44 AM] +91 98235 82116: ✍🏻उतारा लेखन अक्षर क,का......
काका ए काका ,अरे कप आण. काकू तू मला काकाने आणलेल्या कपातच काॅफी दे.कपिला कावड तयार ठेव. काजल ,कविता ,करण येतील.आपण सर्व काकूंना पाणी भरायला मदत करु.
पाणी भरून झालेकी, कारमधून ककवलीला आणि काझीरंगा अरण्याला भेट देऊ.
अरे हो ,रे कालवा करू नका.कावरेबावरे होऊन पाहू नका.. चला सोबत काजू ,करवंद,कणसे घ्या.अरे उन्हामुळे जीव कासावीस होतोय .कारमधील ए.सी. लावा बर.....आपण खूप मजा करू .आल्यावर काका काकूला करामती सांगू..
➖➖➖➖➖➖➖➖
उतार्यावरील प्रश्न सोडवा...
उत्तरे लिहा...
१] काकू कपात काय देणार आहे?
२]उतार्यातील मुलांची नावे लिहा?
३] मुले कोणते जंगल पाहणार होते?
४]कावराबावरा शब्दाचा अर्थ सांगा.
५] कालवा म्हणजे काय?
६] मुलांनी सोबत कोणता खाऊ घेतला होता?
७]लिंग बदला. १) काका..२) मुलगी...
८] समानअर्थी शब्द सांगा .१)पाणी ...२) सोबत...
➖ ➖➖➖➖➖➖
वसुधा नाईक.
पुणे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[10/27, 10:15 AM] +91 97680 69059: उतारा इयत्ता /3री कमल आणी तीचे कुटुंब शेजारच्या कुटुंबारोबर फीरायला
गेले सकाळची वेळ होती रस्त्यात एक तलाव दीसला कमल कांताला म्हणाली
कमळ छान उगवले काल मी पाहिले तेव्हा एक दोनच होते आज आठ दहा तरी असेल कांता कमला जोरात ओरडली कमल ऐ कमल हे बघ कासव कमल म्हणाली अगदी मासा बघ मासा
साप, गाडुंळपण आहे .
खालील प्रश्नांची उत्तरे द्या ?
1) फीरायला कोण कोण गले ?2) उतार्यातील मुलीची सांगा?
3) तलावामध्ये काय दीसले ?
लक्ष्मी ठाकरे
म.न.पा.शाळा
[10/27, 12:26 PM] सुचिता कुलकर्णी मॅम: *आत्मविश्वास*
कमल किशनराव कुलकर्णी ही अतिशय कुशल कलाकार होती.कथाकथन ,टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती तयार करणे
अशा कले मध्ये पारंगत होती.घरची जेमतेम परिस्तिथी आई वडील काबाडकष्ट करून आपल्या मुलाचे कलागुण जोपासण्याचा कसोशीने प्रयत्न करायचे.पैश्याची कमतरता,भासायची पण कमल मध्ये कमालीचा आत्मविश्वास होता.चांगले करण्याची तिची धडपड शेजारीपाजारी, शिक्षक पाहायचे.तिच्या कलेला प्रोत्साहन द्यायचे. एक दिवस कमलने टाकाउपासून टाकाऊ कलाकृती बनवली.शाळेत *कलाकौशल्य* स्पर्धा होती .त्या शाळेचे प्रतिनिधित्व कमल ने केले .कमलच राज्यात पहिला नंबर आला.आई, वडील, शिक्षकांना कमालीचा आनंद झाला.सगळीकडे तिचे कौतुक झाले.तिच्या कष्टाचे चीज झाले
उतारा वाचा खालील प्रश्नाचे उत्तर सांगा
1⃣ कमलचे पूर्ण नाव काय होते?
2⃣कमल कोणत्या कलेत पारंगत होती?
3⃣ कमलला कशाची आवड होती?
4⃣ कमलने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला?
5⃣⭐पारंगत असणे– वाक्यात उपयोग करा
⭐कौतुक करणे
⭐कसोशीने प्रयत्न करणे
सुचिता कुलकर्णी
जि.प.प्रा.शा.पाटोदा
ता.परतूर.जि.जालना
[10/27, 1:34 PM] +91 99604 68394: उतारालेखन लेखन
कमलाकर काका कसारा येथील काजलच्या कायरा मुलीसाठी काजळ, काठाची साडी घेऊन गेले. तेथून ते कायरा सोबत प्राणिसंग्रहालयात गेले, तेथे त्यांनी काळा काळा कावळा, कासव, कांगारू पाहिले. फिरताना कपात गरमगरम चहा पिला. काकांनी कायराला वाटेत येताना कढई, वाती, कमळफुल, कळफलक,
कडे, घेऊन दिले, व काजलने सांगितलेले कापड, कापूर, कापसाच्या वाती, मक्याचे कणीस आणले.
** उतारालेखन वरील प्रश्न
प्रश्न 1_काका कोणत्या गावाला गेले.?
प्रश्न 2 काळा रंग कोणाचा आहे?
प्रश्न 3 फिरताना काकांनी कोणते पेय घेतले?
प्रश्न 4 वाटेत कायराने कोणकोणत्या वस्तू घेतल्या?
प्रश्न 5 कापसाच्या वाती कोणी सांगितल्या?
🤔डोके चालवा 🤔
👉🏻उतारालेखन मध्ये देवघरातील कोणत्या वस्तु आहेत नाव लिहा..
1-
2-
🌹शब्दकोडे 🌹
रंग माझा काळा,
एकाक्ष सर्व म्हणती मला,
तुमचे पुर्वज म्हणून सर्व
मान देतात मला
ओळखा पाहू मी कोण
-
सौ. कुंदा विकास झोपे नवोदित विद्यालय, उल्हासनगर 4, तालुका- उल्हासनगर जि- ठाणे.
[10/27, 2:13 PM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर क का
करन कविता करीना व कमलाकर चौघे कर्जतला काकाच्या गावाला निघाले! रस्त्यावर त्याना करीम कल्पना कसाब व कावेरी मिळाली. करन म्हणाला अरे करीम कुठे निघाला आहे करीम म्हणाला आम्ही करीमनगरला चाललो आहोत. तेथे आम्हाला काका काकू व काही ओळखीचे काका यांना भेटायला चाललो. तेथे प्राणी व पक्ष्यांचे संग्रहालय पाहायला जाणार आहोत. तेथे कासव काळवीट कोकीळ कावळा कोंबडा इ. प्रानी बघायला जाणार आहेत.
खालील प्रश्नाची उत्तरे द्या.
1_करजतला कोण जाणार आहे
2_कनकवलीला कोण जाणार आहे
3_करन कोनाला भेटायला जाणार आहे
सुनंदा पाटील बोरविहीर ता.जि.धुळे!
[10/27, 2:32 PM] +91 94239 37640: *उतारा*
क,का
कमलदास काल कळमदेवीला गेला. कळमदेवीला कल्पना राहात होती.कल्पना कडे कमळ फुले होतु.कमलदासने कल्पना कडील कमळफुल काढले. कल्पना कमलदासचा राग केला नाही.कल्पनाने कमलदासला कमळ फुलासोबत करवंदे काढून दिली.कमलदासनेही करवंदे काढली.करवंदे काढतांना कमलदासला करवंदाचा काटा टोचला .कल्पनाने कमलदासचा काटा काढून दिला.कल्पना कमलदास करवंदे खात बसली. करवंदे खातांना दोघांना आनंद झाला.
*प्रश्न*
1 कमलदास कोणत्या गावाला गेला.?
2 कळमदेवीला कोण राहात होती.?
3 कल्पना कडे काय काय होते.?
4 कमळफुल कोणी काढले.?
5 कमळफुलासोबत कल्पनाने काय दिले .?
6 कमलदासला कशाचा काटा टोचला.?
7 काटा कोणी काढून दिला .?
8 करवंदे कोण खात बसली?
9 कल्पना कमलदास काय खात बसली?
10 दोघांना आनंद केव्हा झाला?
*सौ कुमुद नेहेते*
शासकीय आश्रम शाळा मालोद ता.यावल जि.जळगाव
इयत्ता 2री
[10/27, 3:31 PM] +91 94041 37398: 💐💐💐💐💐💐💐💐💐
* *उतारा लेखन*
*क का*
करजगावची कांदळेची *कमल*कोकणला कामिनी व कांचनकडे कनकवलीला गेली.
कामिनीचे पती कृषिअधिकारी होते.त्याच्याकडे काजूची बाग होती. काजूच्या बागेत कामिनी व तिचे पती कांतेश्वर कष्ट करायचे.
कामिनी,कांचन व कमल कनकवलीचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेल्या व तेथून केतकावळेला देवदर्शन केले.
कोकणातील निसर्ग सौंदर्य बघून कमल हरखून गेली.
*स्वाध्याय*
प्रश्न. कमल कोठे गेली?
प्रश्न. कमलच्या मैत्रिणींची नावे लिहा?
प्रश्न. कामिनीकडे कश्याची बाग होती?
प्रश्न. कामिनीचे पती कोण होते?
प्रश्न.उताय्रात आलेली गावाची नावे लिहा?
प्रश्न.हरकून जाणे ..या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा?
*************************
*ऋजुता महिन्द्रे*
*जि.प.शाळा सिंगद*
*दिग्रस यवतमाळ*
*वर्ग*5 वा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
[10/27, 9:21 PM] +91 73879 98829: उतारा
क
का
काल काजोल देवगण कानशिवनीला येणार अशी बातमी कमलने ऐकली. कमलनेकाकाच्या कापसाला जाने सोडून कानशीवनीला काकूसोबत त्यांच्या माहेरी गेली .कमल काकू यांना खूप आनंद झाला पण ज्यास्त काळ टीकू शकला नाही .कारण ज्या कारणासाठी काकू थांबल्या होत्या, ती काजोल चे येणे रद्द झाले होते.
प्रश्न
१ - कानशीवनीला कोन येणार होते?
२- कमलला कोनती बातमी समजली होती?
३- कमल कापसाला जाणे सोडछन कोठे गेली?
४-
काकूंना का आनंद झाला?
शालिनी मोरडे
जि.प.प्रा.शाळा सीसा
प.स.अकोला
[10/28, 8:51 AM] +91 99604 68394: *उतारालेखन **
खर सागा खाशाबा खानापूरला आपण खानावळ सुरू करूया का. आपण खानावळ मध्ये आपण खानावळ मध्ये खामगावचा प्रसिद्ध खाचणेचा खवा, खरबूज, खजूर विविध खाद्यपदार्थ ठेवुया. व बाजूला दुकान पण खोलुया,त्यात खसखस, खण, खटारागाडी, खडू, रंगीत खडे, खताचे प्रकार असा सर्व खजिना ठेवुया.
त्यासाठी आपल्या खुप खटाटोप करावा लागेल. मी लहान असले तरी कामात माझा खारीचा वाटा असेल. त्यासाठी आपण खारघर च्या खासदार काकांचे मार्गदर्शन घेऊया.
विचार करा खाशाबा, मी तोपर्यंत आईला खारीक खोबर आणून देते.
प्रश्न 1 उतारालेखन मध्ये किती व्यक्ति आहेत?
प्रश्न 2 मार्गदर्शन कोणाचे घेणार आहेत?
प्रश्न 3 खानावळ मध्ये खामगावचा प्रसिद्ध काय ठेवणार आहेत?
प्रश्न 4 आईला काय आणून द्यायचे आहे?
प्रश्न 5 डोके चालवा.
खारीक-खोबरे यासारखे तुम्हाला माहित असलेल्या शब्दांची यादी तयार करा.
प्रश्न 6 शब्द कोडे
छोटी छोटी गोल गोल,
पांढरीशुभ्र छान,
माझा आहे वेगळाच,
मसालेदार मान,
सांगा पाहू मी कोण.
-
प्रश्न 7 स्पष्ट करा
खारीचा वाटा ऊचलणे.
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय उल्हासनगर 4 तालुका उल्हासनगर जि ठाणे
[10/28, 9:02 AM] +91 98235 82116: 🌿उतारा..अक्षर ख,खा🌿
खार झाडावर सरसर चढली .खुशीच्या खिडकीतून डोकाऊ लागली. खुशाल घरात यायचा प्रयत्न करू लागली.खलिफा,खातून खुशीचे मित्र तिथेच होते.सर्व खिडकीबाहेर पाहू लागले.खारूताई झाडावर आलेला पेरू खात मस्त पाहात होती.इकडून तिकडे सरसर चढत होती.सर्व मुले खूपखूप खूश झाली...आज त्यांना पुस्तकात पाहिलेली खारूताई प्रत्यक्ष पाहायला मिळाली होती.
➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्नउत्तरे लिहा.
१) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
अ]खिडकितून कोण डोकावत होते?
आ] खुशीच्चा मित्रांची नावे लिहा.
इ] खारूताई कोणते फळ खात आहे?
ई] खार झाडावर कशी चढते?
२)रिकाम्या जागा भरा.
अ] खार ➖➖ खिडकितून डोकावू लागली.
आ]सर्व मुले खूपखूप ➖➖झाली.
३) उतार्यात आलेले जोडशब्द लिहा.
४)खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
अ] सरसर
आ] खुशाल
इ] इकडेतिकडे.
➖➖➖➖➖➖➖➖
वसुधा नाईक
अरण्येश्वर विद्या मंदिर पुणे..
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
[10/28, 10:50 AM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर ख खा*
खुशाल व खुशी खरगोनला खुशाबा खरे खासदारांकडे गेले. खलनायक होऊन खिलाडी खाली गेला. खरगोनला _खाशाबा पहलवानाची कुस्ती पाहिली. खारीक खोबरे घालून केलेले लाडू खूप खाल्ले. खरवस खखिचडीची खरड व मिरचीचा खर्डा खाल्ला.
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१)खरगोनला कोण कोण गेले?
2) खासदारांचे नाव काय आहे?
3) खरवस म्हणजे काय?
४)लाडू कशाचे बनवले आहेत?
५)खरड कशाची होती?
६)दार प्रत्यय लावून पाच शब्द लिहा.
*सुनंदा पाटील*
*बोरविहीर ता.जि.धुळे*.
[10/28, 3:54 PM] +91 94239 37640: *उतारा लेखन*
ख,खा
ख
खा
खारूताई.
खारूताई खाली आली.
खारूताई झाडावरून खाली आली.
खारूताई खजूरच्या झाडावरून खाली आली.
खाररूताई खजूरच्या झाडावरून खाली आली.खारवलेल्या .
खारूताई खजूरच्या झाडावरून खाली आली खारवलेल्या खाऱ्या शेंगा.
खारूताई खजूरच्या झाडावरून खाली आली खारवलेल्या खाऱ्या
शेंगा खाऊ लागली.
खारूताई खजूरच्या झाडावरून खाली आली .खारवलेल्या खाऱ्या शेंगा खादाडसारखी खाऊ लागली.
खारूताई खजूराच्या झाडावरून खाली आली .खारवलेल्या खाऱ्या शेंगा खादाडसारखी खाऊ लागली .खादाड खारूताई
खातच राहिली.खातच राहिली.
*सौ कुमुद नेहेते*
शा.प्रा.आश्रम शाळा मालोद ता.यावल जि.जळगाव
[10/28, 4:02 PM] +91 94239 37640: प्रश्न 1 झाडावरून कोण खाली आले?
2 खारूताई कोणत्या झाडावर होती?
3 खाली काय खाऊ लागली?
4 शेंगा कशा होत्या?
5खारूताई कशी आहे?
6 खादाड कोणाला म्हटले आहे?
7 खारूताईला खादाड का म्हटले?
8 खा ने सुरू होणारे शब्द शोधा व लिहा.9 खारवलेल्या शेंगा तुम्हाला आवडतात का?
*सौ कुमुद नेहेते*
[10/28, 5:02 PM] +91 73879 98829: उतारा लेखन
खा,खा, खुशी खुशाल खा.मी तुला नेहमी सांगते,खुशी खारीक खावू नको. खुशी खोबरे खखवू नको.तु ते ऐकशील का? जशी लहान आहे.जेवन नसले तरी चालेल. पण तीला खारीक ,खोबरे ,खजूर पाहीजे.खुशी खावून खावून लठ्ठ झाली की समजेल तुला. अ ग खुशीतुझे लग्न आहे या वर्षी मुलांना लठ्ठ मुली आ्वडत नाहीत.
प्रश्न} १. खुशीला काय खायला आवडते?
२. आई खुशीला नेहमी काय सांगते?
३. या वर्षी कुणाचे लग्न आहे?
शालिनी मोरडे
जि.प.शाळा सीसा
प.स. अकोला
[10/28, 5:50 PM] +91 94239 37640: *उतारा लेखन*
ख,खा
खजूरचे झाड होते.त्या खजूरच्या झाडावर खारूताई खाद्य शोधत होती.खेमाच्या आईने खारवलेल्या ओल्या खाऱ्या शेंगा खाटेवर टाकल्या. खारूताईने पाहिल्या व खजूरच्या झाडावरून सरसर खाली आली खाटेवर बसून छानपैकी खारवलेल्या खाऱ्या शेंगा खादाडसारखी खाऊ लागली.खारूताईला खारवलेल्या खाऱ्या शेंगाची मेजवानी मिळाली.खारूताईला खारवलेल्या खाऱ्या शेंगा खूप खूप आवडल्या
खातच बसली, खातच बसली.
खाता खाता सुस्त झाली खाटेवरच झोपून गेली.
*प्रश्न* 1 खारूताई कुठे होती?
2 खारूताई काय शोधत होती ?
3 खारूताईने काय पाहिले ?
4 सरसर झाडावरून कोण उतरले ?
5 खाटेवर काय होते ?
6खारूताई काय खात होती ?
7 खारूताईला कशाची मेजवानी मिळाली?
8खारूताई सुस्त का झाली.?
9 खारूताई कुठे झोपून गेली. ?
10 खाटेवर कोण झोपले.?
11 खरवलेल्या शेंगा कुणी फस्त केल्या ?
12खा ने सुरू होणारे शब्द शोधा व लिहा
*सौ कुमुद नेहेते *
शासकीय प्राथमिक आश्रम शाळा मालोद ता.यावल जि. जळगाव.
[10/28, 8:06 PM] शिला ताई: *संवादपर उतारा*
*खतीब* : खानचाचा मला खाऊ हवाय.
*खानचाचा* : काय देऊ तुला
खायला?
*खतीब* : खरवस दया ना.
*खानचाचा* : हां घे खरवस खा.
*खतीब* : मला खरबूज पण पाहिजे.
*खानचाचा* :अरे खादाडा! किती रे खाशील!
*खतीब* : दयाना मी झाडाखाली बसून खाईल कोणाला खबर लागू देणार नाही.
*खानचाचा* : बरं बरं पण खटाऱ्यात बसू नकोस तिथे ख़त आहे खाटेवर बसून खा.
*प्रश्न*
✏वरील उताऱ्यात किती जण संभाषण करत आहेत?
✏उताऱ्यातील मुलाचे नाव काय आहे?
✏उताऱ्यातील माणसाचे नाव काय आहे ?
✏खतीब काय खायचे आहे?
✏खटाऱ्यात काय ठेवलेले आहे?
✏खतीब कुठे बसून खाऊ खातो?
➖➖➖➖➖➖➖➖
लेखन
श्रीमती अम्भुरे एस. के.
जि. प. प्रा. शा. पाटोदा (माव)
ता .परतुर जि .जालना
वर्ग =दुसरा
〰〰〰〰〰〰〰〰
[10/29, 2:12 AM] +91 97680 69059: ठसा
पहिला दीवस अमर कमल जगन राधा शाळेत आले मी आणि त्या मुलांचे पालक सोबत काही नवीन दाखला मुले व पालक .मीत्रहो शाळा म्ह्टले की पालकांना आणि मुलांना शाळेचा पहिला दिवस आपले मुलगा शाळेत जानार आपला ठसा कसा उमटेल म्हणून शिक्षक आणी पालक प्रयत्नात आसतात पालकांना मुलांना नवीन कपडे दप्तर बुट अशाप्रकारे स्वत ही चांगलेच तयार होऊन आपला ठसा शिक्षकावर उमटवतात. शिक्षकांना मुलांना पालकांना खास चाॅकलेट ,खाउ,काही भेट वस्तू देतात .
काही शाळेत पावलांचे ठसे ,हाताचे ठसे विविध रंगाने पालक आणि मुले दोघांचेही घ्यावेत तेव्हा ठसे भिंतीवर कागदावर घेतले यातूनच आजपासून प्रगतीचे ठसे दिसतील अशीच सविस्तर समजूत असणे गरजेचे आहे
जीवनात ठशाचे मह्त्वा मला समजले
खालील प्रशनाची ऊत्तरे द्या .
1) पहीलाच दिवशी शाळेत कोण कोण आले ?
2) पालकांना कशाचाच आनंद वाटतो ?
3) शाळेत मुलांचेच स्वागत कसे केले ?
4) पालकांनी आपला ठसा कसा ऊमटवला ?
5)शाळेत मुले कुनासोबत आली ?
6) मुलांच्या दप्तरात काय काय असेल ?
7) मुले कशाप्रकारे तयार होऊन आली ?
8) आपला ठसा ऊमटवण्यासाठी शिक्षकांनी कसे प्रयत्न केले ?
9) ठसे कशा कशा वर घेतले ?
10 यातुन शाळेतिल मुले काय शिकतील ?
लक्ष्मी ठाकरे
म.न.पा .शाळा क्र 132
[10/29, 10:21 AM] शिला ताई: *उतारा क्र 3*
*अक्षर ग, गा*
गायत्रीला गायनाची आवड आहे. तिचा गळाही गोड आहे .नवीन गाणे ऐकले की ती लगेच गाऊन बघायची. तिला गायनाचा छंदच जडला. गायनासाठी गायत्रीने गावाकडील गणित शिक्षिकेची नोकरी सोडली. गुरुवारी गाणगापुरला गायत्रीचे गायन आहे. ती गवळन गाणार आहे. गायन म्हणजे तिचे जग. या गायकीच्या जगात तिला गरूडासारखी गगनभरारी घ्यायची आहे.
*प्रश्न* 👇🏻
👉🏿गायनाची आवड कोणाला आहे?
👉🏿गायत्रीला कशाची आवड आहे?
👉🏿गायत्रीला कशाचा छंद जडला?
👉🏿गायत्री कोणत्या विषयाची शिक्षिका होती?
👉🏿गायत्रीला कोणती नोकरी होती?
👉🏿गायत्री कुठे नोकरी करायची?
👉🏿गायत्रीचे गायन कुठे आहे?
👉🏿गायत्री काय गाणार आहे ?
👉🏿लिंग बदला =1 गायिका
2 शिक्षिका
👉🏿 गायनकलेशी संबधित शब्द सांगा / लिहा .
➖➖➖➖➖➖➖➖
✏लेखन /शब्दांकन✏
🦋अम्भुरे एस के 🦋
जि प प्रा शा पाटोदा (माव)
ता परतुर जि जालना
वर्ग :दुसरा
[10/29, 10:44 AM] +91 94239 37640: *उतारा लेखन*
ग,गा
गडचिरोली गाव खूप लांब आहे. गणपत काकांची गार्गी तेथे गजरे व हार विकते .शेजारी गणेशाचे मंदिर आहे. गजानन तेथे पुजारी आहे.
गणेश मंदिरात खूप गर्दी असते.
गणेशोत्सव तर खूप धामधुमीत साजरा होतो. गजेंद्रने गणेशाला मोदकांचाप्रसादचढविला .गणेशाला जास्वंद 🌺व दुर्वा खूप आवडतात.
.गजाननने गार्गीकडून गणेशमुर्तीसाठी हार घेतला.
गजानन, गार्गी,गजेंद्रव इतर यांनी
गणेशाची पूजा, आरती केली.मंदिर गजबजून गेले.
गदाधरने गणेश मंदिरात सुंदर गालीचा दिला.छान गणेशाची गाणी लावलेली होती. गणेश मंदीराचा परिसर गणेश मंदिरामुळे
नेहमी गजबजलेला असतो.
*प्रश्न*
1 गावाचे नाव काय आहे?
2 गडचिरोलीला कशाचे मंदिर आहे.?
3 गणेश मंदिराततील पूजारी कोण ?
4गार्गी कोणते काम करते.?
5कोणता उत्सव धामधुमीत होतो.?
6गजाननने काय विकत घेतले.?
7 गणेश आरतीला कोण कोण होते.?
8 गालीचा कोणी दिला.?
9गजेंद्रने काय दिले?
10 गणेशाला मोदक कुणी आणले.?
11 प्रसाद काय होता.?
12 गणेशाची ,गणपतीची आरती कोणती सांगा
13 गणपतीचे चित्र मिळवा व रंगवा
14 गणेशाच्या आवडत्या वस्तू कोणत्या.?
*सौ कुमुद नेहेते*
शा.आ.शाळा मालोद ता.यावल जि.जळगाव
[10/29, 11:37 AM] +91 98235 82116: आजचा उतारा अक्षरग,गा✍🏻
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
गजानान ,गौरी चलारे गाणगापूरला. गाडी आली आहे.गणंजय,गीता, गणनायक,गारगी आलात कारे? शेतातली गाजरं घ्या बरोबर.
गाणगापूरला पोहोचल्यावर गणततीच्या दर्शनासाठी सर्व रांगेत उभे राहिले.अचानक गौरीला चक्कर आली. गोरे गुरूजींनी पाहिले.त्यांनी गौरीला गणपतीजवळचा गुळाचा खडा खायला दिला.तिला बरे वाटू लागले.गजबजलेली गर्दी पाहून तिला चक्कर आली असावी. गोरे गुरूजींनी तिला व गीताला लगेचच दर्शन घेऊन दिले. बाकी मुलांनी रांगेत दर्शन घेतले.सर्व दर्शन घेऊन बाहेर आले मग ते गणपत काकांच्या घरी मुक्कामाला गेले...
➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्न उत्तरे
१] उतार्यात आलेली गणतीची नावे शोधून लिहा.
२] गौरीला अचानक काय झाले?
३] गोरे गुरूजींनी गौरीला काय दिले?
४]सर्व मुले मुक्कामाला कोणाच्या घरी गेली?
५]उतार्यात कोणत्या गावाचा उल्लेख आला आहे?
६] लींग ओळखा .
अ) गारगी
ब) गणपतकाका
७] विरूद्ध अर्थी शब्द लिहा.
अ) काळेx
आ) आतx
➖➖➖➖➖➖➖➖
वसुधा नाईक
पुणे
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[10/29, 12:49 PM] सुचिता कुलकर्णी मॅम: *ग चा उतारा*
गणू हा चौथीमध्ये शिकणारा मुलगा.गोंधळ करण्यात पटाईत म्हणून आई वडिलांनी गणेशपूर येथे शिकण्यास ठेवले. गोट्या खेळणे, गाणी म्हणणे, गायीला चारा आणणे, गंमतीजमती करणे, त्याचे आवडते उद्योग.शाळेत त्याचे मन रमायचे नाही, गणित विषय अवघड जायचा. गणिताचे सर तर जाम कंटाळले. गणूचे काही गुण गौरवास्पद होते. गणू मात्र छान गवळण, भारुड, भजन गायचा.गाण्याचा छंद छान जोपासण्यासाठी गाण्याचे शिक्षक त्याला गायनासाठी प्रोत्साहन द्यायचे.गणू सुंदर, खड्या आवाजात गवळण गायचा.
गणूच्या गवळणी पूर्ण तालुक्यात गाजायच्या.गणेशपूरच्या शाळेत एकदा गायन स्पर्धेसाठी मोठे मोठे गायक आले होते.गणूची गवळण ऐकली.गणूचा गायनात पहिला नंबर आला
गणू गवळ्याची गवळण प्रसिद्ध झाली.
*समजपूर्वक उतारा वाचा*
*प्रश्नाची उत्तरे लिहा*
1⃣ गणू कितवीत शिकत होता?
2⃣गणूला शिक्षणासाठी कोणत्या गावाला ठेवले?
3⃣ गणूचे आवडते काम कोणते होते?
4⃣गणूला कोणत्या विषयाचा कंटाळा होता?
5⃣ कोणाची गवळण प्रसिद्ध आहे?
6⃣ तुम्हाला आवडते गाणे कोणते?
7⃣आवडीचे गाणे म्हणा.
[10/29, 2:25 PM] +91 94041 37398: ******************************
*उतारा*
*ग गा*
गजापूरच्या कुरणावर गारगार वारा सुटला होता. गवत वाय्रासोबत डुलत होते.गजेश,गणेश व गजेन्द्र डुलणाय्रा गवतातून रमतगमत गातगात गावाकडे चालले होते. वाटेत त्याना गवा व गाढवांचा कळप दिसला. कळप बघून गजेन्द्र म्हणाला,"गवे तर थोडेफार गायीसारखे दिसतात." यावर गणेश म्हणाला ,"गवे दिसतात गायीसारखे पण गायीसारखे गरीब नसतात. आपल्या खुरांनी दगड मागे फेकून प्रतिकारूथ करतात." हे ऐकून गजेश व गजेंद्र घाबरून गावाकडे जाण्यास गडबड करू लागले.
गणेश, गजेश व गजेन्द्र लगबगीने गावात परत आले.
प्रश्न. कुरणाकडे कोणकोण फिरायला गेले?
प्रश्न. परिच्छेदात आलेली प्राण्यांची नावे सांगा?
प्रश्न.कुरण म्हणजे काय?
प्रश्न. मुले का घाबरली?
प्रश्न. गवे प्रतिकार कसे करतात?
प्रश्न.ग अक्षराने सुरूवात असलेले शब्द लिहा?
प्रश्न. ग अक्षराचे शब्द नसलेले वाक्य शोधा व लिहा?
*******************************
*ऋजुता महिन्द्रे*
*यवतमाळ*
[10/29, 2:34 PM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर ग गा*
गमन व गबा गंगाधर गंगा ते गंगापूर गेले होते. गवतावर छान गालिचा टाकला होता. गंगेच्या गालावर खळी पडत आहे. गमने गगनभेदी आरोळी मारतो. गंगाधर ला गूळ खूप आवडतो. गंगेच्या गालावर खळी पडत आहे! त्यांनी गाण्याच्या भेंड्या लावल्या होत्या.
[10/29, 5:21 PM] Asif: गाणगापूर हे एक मोठे गाव. त्या गावात गणेश नावाचा मुलगा राहत होता. तो गंगामाई विद्यामंदीर या शाळेत शिकत होता. तो पुढील शिक्षणासाठी गंगापूर या ठिकाणी आला.
गंगापूरमध्ये गामा मामा राहत होता. गणेश त्या ठिकाणी गेला आणि आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. मामाच्या शेतात गवार, मेथी, असे विविध प्रकारचे भाजी तो पिकवत असे आणि गणेशही मदत करी. तो पुढे कृषीतज्ज्ञ झाला व गाणगापूरचे नाव उज्ज्वल केला.
प्रश्न
१.गणेश कोठे राहत होता?
२.मामा कोणत्या गावात राहत होता?
३.मामाचे नाव लिहा.
४.शेतामध्ये कोणकोणते पीक घेत असे?
५.गणेश कोणत्या शाळेत शिकत होता?
६.पुढील शिक्षण घेण्यासाठी गणेश कोठे गेला?
७.गणेश कोठे राहत होता?
८.गणेश कोठे व कोणास मदत करत असे?
९.गाणगापूरमधील शाळेचे नाव लिहा?
१०.पुढे काय झाला?
११.समानार्थी शब्द लिहा.
१)वावर---
२)विद्यालय--
१२.लिंग बदला.
१)मामा---
२)मुलगा--
🌹आसिफ मौला शेख🌹
ज्ञान प्रबोधन विद्यालय, सोलापर.
[10/29, 6:06 PM] सुचिता कुलकर्णी मॅम: *ग चा उतारा*

$$ *एक उतारा माझा पण*$$
✏ *सुचिता कुलकर्णी*✏
जि.प.प्रा.शा.पाटोदा
ता.परतूर.जि.जालना
[10/29, 6:48 PM] +91 99604 68394: *उतारालेखन ग गा*
गांडगापुर वरुन येताना खोपोली येथील गगनगिरी महाराज यांना नमस्कार केला व तेथून आम्ही गणेश पुरी येथे गेलो. माझ्या सोबत गणेश, गार्गी, गजानन होते. परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा वाटेत आम्ही वाटेत गणपत गावडे यांच्या शेतात थांबले.
शेतात हिरव्या हिरव्या गवताचा गालिचाच जणू अंथरलेला होता. गणेशने थोडे गवत घेऊन शेतातील गायला चारले.ते बघून जवळच असलेले गाढवसुदधा ओरडू लागले. सर्व गमतीजमती बघताना मुलांना खुप मजा वाटत होती, गणपती अधुनमधुन गवताच पात गालावर फिरवत होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, नंतर आम्ही सायंकाळी गणपती उपासना केली. व गाण्याच्या भेंड्या खेळलो. गयाकाकूंनी आम्हाला गवळण गाऊन दाखवल्या, व बाजूच्या शेतात उतरलेल्या गवळी लोकांची सुद्धा ओळख करून दिली, नंतर गाठोडीमधुन गोधडी अंथरून आम्ही थंड गारव्यात शांत निजलो.
-------------
प्रश्न 1 खोपोली ला सर्वानी कोणाला नमस्कार केला.?
प्रश्न 2 मुलांनी गायला काय चारले.?
प्रश्न 3 मुक्काम केलेल्या व्यक्तीच नाव काय आहे.?
प्रश्न 4 सर्वांनी कोणाची उपासना केली.?
प्रश्न 5 शेवटी ग येणारे शब्द लिहा.
जसे - राग
प्रश्न 6 माझा आवडता प्राणी 'गाय' या विषयावर निबंध लिहा.
प्रश्न 7 शब्द कोडे सोडवा.
हिरवा हिरवा माझा रंग,
मऊ मऊ माझे अंग,
मला खाऊनच प्राणी
होतात धष्टपुष्ट,
शेतकरी राजाचा मी मित्र,
ओळखा पाहू मी कोण.
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय उल्हासनगर 4 तालुका- उल्हासनगर,7 जि- ठाणे.
[10/29, 6:51 PM] +91 94214 31970: गणेश गंगाधर गाड हा गमतीदार गोष्टी रचून सांगायचा. गेल्या गुरुवारी सकाळी गण्या गोविंदाकडे गेला. गोविंदाकडील सर्व पुस्तके गोळा केली. बागेत गेला आणि त्याने सर्व पुस्तके हिरव्यागार गवतावर बसून वाचली. गणू गमतीदार गोष्टी वाचण्यात मग्न झाला. अशाप्रकारे गण्याला वाचनाचा छंद लागला.
प्रश्न
1) गणेश पुस्तके आणायला कोणाकडे गेला होता?
2) गणेशची टोपणनावे कोणती?
3) गणेशला कोणता छंद होता?
[10/30, 7:59 AM] +91 94041 37398: 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*उतारा लेखन*
*घ घा*
घराबाहेर खेळायला गेलेला घनश्याम घाईघाईने घराकडे निघाला. वेळ झाल्यामुळे घाबरलेला होता.
घरी येताच आई घनश्यामला म्हणाली,"बाळा ,घनश्याम दिवाळीचे दिवस आहे घराबाहेर एवढा वेळ घालवू नये.घरातील कामात मदत कर." "बर,सांग कोणते काम करायचे ते." आईने सांगितलेले काम घनश्याम घाईने करू लागला.घर अंगण झाडले. घागरीतले पाणी घेऊन अंगणात टाकले.रंगीत सुंदर रांगोळी घातली.दिवे घासून स्वच्छ करून तेलवात घातली.
घरात आईने केलेल्या फराळाचा नुसता घमघमाट सुटला होता. आई घराबाहेर आली.घनश्यामने केलेल्या कामाचे कौतुक आईच्या चेहय्रावर स्पष्ट दिसत होते.
आईने घनश्यामला जवळ घेतले व कौतुक केले.
*प्रश्न*. घनश्याम घराबाहेर कशाला गेला होता?
*प्रश्न*. सण कोणता होता?
*प्रश्न*घनश्यामने कोणकोणती कामे केली?
*प्रश्न*. हा सण किती दिवसाचा असतो?
*प्रश्न*दिवाळी कोणत्या मराठी महिन्यांत येते?
*प्रश्न*'दिवाळी 'या सणाबद्दल माहिती लिहा?
--------'----'-----'--------'-----'------'-------'-----
*ऋजुता महिन्द्रे*
*यवतमाळ*
*इ.5 वी*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
[10/30, 9:47 AM] +91 98235 82116: 🍀आजचा उतारा अक्षर 🍀
🌹घ,घा🌹
घाशीराम घाईघाईने कोकणात मामाकडे जायला निघाला. त्याला आंबा घाट लागला. तो घनदाट वनराईतून जात हौता. घाशीराम मामाच्या घरी पोहोचला. प्रथम त्याने मुलांना केळ्याचा घड काढून दिला.
प्रवासात उन्हामुळे घाम आला होता. तो आंघोळिला गेला. नंतर त्याने देवाला नमस्कारकेला. घंटा वाजवली.
मुलांना घेऊन तो परसबागेत गेला. झाडावर पक्ष्यांनी बांधलेल्या घरट्यांचे निरीक्षण केले. घेवड्याचा वेल पाहिला.
मामीने सर्वांना जेवायाला बोलावले . गरमगरम घावण खावून घाशीरामने घागरीतले पाणी गडूने घटाघटा पिले.
➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्न उत्तरे....✍🏻
१) घाशीराम घाईघाईने कोठे निघाला?
२) मुलांना घाशीरामने कोणता खाऊ दिला?
3) मामीने जेवायला काय बनवले होते?
४)खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
अ] घटाघटा
आ ] घंटा
इ] वनराई
५) उतार्यात आलेला जोडून येणारा शब्द लिहा.
६) केळ्यांचा ➖घड
या प्रमाणे समूहदर्शक शब्द लिहा.
क] पक्ष्यांचा➖ख
[10/30, 9:47 AM] +91 98235 82116: ख] नाण्यांची➖
➖➖➖➖➖➖➖➖
वसुधा नाईक
पुणे..
➖➖➖➖➖➖➖➖➖
[10/30, 9:55 AM] शिला ताई: *उतारा क्र 4*
*अक्षर घ घा*
अतिघाई
राघव घरी जायला निघाला. उशीर झाल्यामुळे तो जरा घाईतच होता. अंधारही झाला होता. गाडी घेऊन तो निघाला. तो आता घाटात पोहचला. घाटात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती. म्हणावी तशी वाहतूक नव्हती आणि अंधारही असल्यामुळे राघव जरा घाबरलाच तो घाई घाईने गाडी चालवू लागला. भीतीने त्याला घामही फुटला. अचानक ......अचानक काही समजण्याच्या आत त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी घाटात पडली. राघवचा अपघात झाला. तो घायाळ झाला. घाईने घाबरून गाडी चालवणे राघवसाठी घातक ठरले. म्हणतात ना 'अति घाई संकटात नेई'.
*प्रश्न*
👉🏿उताऱ्यातील व्यक्तीचे नाव काय आहे?
👉🏿राघव घाईत का होता?
👉🏿राघवचा अपघात कोठे झाला ?
👉🏿घनदाट झाडी कोठे होती ?
👉🏿 रस्त्यावर असलेली घोषवाक्ये जमवा.
👉🏿वरील उताऱ्यात घ आणि घा या अक्षरांपासून सुरु होणारे शब्द लिहा .
👉🏿शेवटी ई हे अक्षर येणारे शब्द लिहा.उदा.=घाई
👉🏿समानार्थी शब्द लिहा = घायाळ
घाई
👉🏿वाक्यात उपयोग करा
1 घाबरला
2 घाम फुटला.
👉🏿उताऱ्याचे प्रकट वाचन /अनुलेखन करा.
➖➖➖➖➖➖➖➖
✏लेखन /शब्दांकन ✏
🦋 श्रीमती अम्भुरे एस के🦋
जि प प्रा शा पाटोदा
ता परतुर जि जालना
[10/30, 11:08 AM] सुचिता कुलकर्णी मॅम: *$$$ समजपूर्वक उतारा वाचन$$$*
घनश्याम काका , अनघा काकू दोघांचा सुखी संसार.
घरी दोन मुलं सूना घर गजबजलेलं .घरात आनंदाचे वातावरण होते.
घरातील आनंद पाहून शेजारीपाजाऱ्याना हेवा वाटायचा. एकदा घनश्याम काकाला दरदरून घाम फुटला, घश्यात कोरड पडली.घाबरत घाबरत ओरडले . घरात फक्त अनघा काकू होत्या घाईघाईने घोडके डॉक्टरांना फोन केला.घाबरलेल्या अवस्थेत दवाखान्यात दाखल केले.
घोडके डॉक्टरांनी योग्य निदान करून घनश्याम काकाला संकटातून बाहेर काढले. घनश्याम काकांची तब्येत सुधारली सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.घनश्याम काका आनंदाने सुखरूप घरी पोहोचले.
उतारा समजपूर्वक वाचा व प्रश्नाची उत्तरे लिहा
1⃣उताऱ्यातील व्यक्तीची नावे सांगा
2⃣घनश्याम काकाला कोणत्या डॉक्टरांनी तपासले?
3⃣वाक्यात उपयोग लिहा
👉🏾हेवा वाटणे–
👉🏾सुखरूप पोहोचले
👉🏾जीव भांड्यात पडणे
4⃣घनश्याम काकाला किती मुलं होते?
5⃣तुम्ही काय कराल?
👉🏾 घरात कुटुंबातील व्यक्तीचे असे दुखत आहे असे लक्षात आल्यावर तुम्ही काय कराल?
👉🏾चूक की बरोबर सांगा
👉🏾आजारी माणसांना दवाखान्यात नेऊ नये.
👉🏾म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेऊ नये.
👉🏾दुखत असेल तर लवकर दवाखाना जवळ करावा.
👉🏾 *$$$एक उतारा माझा$$$*👈🏾
🙏🏻 *$$$सुचिता कुलकर्णी$$$*🙏🏻
*जि.प.प्रा.शा.पाटोदा*
*ता.परतूर. जि.जालना*
[10/30, 4:03 PM] +91 99604 68394: *उतारालेखन **
*घाटातील हल्ला **
घनश्याम घाईघाईने घनदेवी मामीला सांगू लागला. घणसोली चे घरत काका घाटातून येत असताना त्यांच्यावर त्यांच्या वर घारने हल्ला केला त्यात ते घायाळ झाले, घनदाट जंगल असल्याने त्यांना समोरचे दिसले नाही. फारच वाईट घटना घडली. त्याच्या घशाला कोरड पडली होती.
मामीने घागरीतील पाणी घनश्याम ला प्यायला दिले व केळीच्या घडतील केळी खायला दिले. व देवीच्या घटाला नमस्कार करून स्वतःला प्रदक्षिणा घातली म्हणाला व म्हणाल्या सर्व निट होईल.
घाशीराम मामासोबत त्या दवाखान्याच्या दिशेने निघाल्या.
प्रश्न 1 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा.
अ) घाटात हल्ला कोणावर झाला.?
ब) घनदेवी काकूंना कोण सागत आले.?
क) हल्ला कोणी केला.?
प्रश्न 2 स्पष्ट करा
घशाला कोरड पडणे.
प्रश्न 3 तुमच्या शब्दात तुम्ही पाहिलेल्या घाटाचे
वर्णन करा.
प्रश्न 4' घराचे' चित्र काढा व रंगवा.?
प्रश्न 5
नागमोडी वळणावर शोभुन दिसतो मी,
निसर्गाचा अमाप खजिना माझ्या कुशीमधी,
सर्वाना मला बघण्याचा हेवा वाटतो भारी,
डोंगर नाही, पर्वत नाही, ओळखा पाहू मी कोण.
*घाट*
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय. उल्हासनगर 4, तालुका उल्हासनगर, जि ठाणे.
[10/30, 4:13 PM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर घ घा*
घुमा व घनश्याम घारापुरीच्या लेणीवर गेले होते. तेथे घुमाची घड्याळ हरवली होती. घनश्यामने खूप शोधाशोध केली. नंतर घुमाच्या घागरा जवळ घड्याळ सापडले. नंतर ती घाईघाईने घरी आली. त्यानंतर तिने घागर घासून घुंगरू जवळ ठेवली. घुमा घागर घेऊन घरातून घाटावर निघाली. घाटातील नदीचे पाणी घागरीत घेतले व घरी येत असताना घाटावर घळीत घरंगळत घसरून पडली. पडल्यावर तिला खूप घाम आला.
*खालील प्रश्नांची उत्तरे द्या*
१)घुमा कोणत्या लेणीवर गेली होती?
२)घुमाचे काय हरवले होते?
३)घड्याळ कोणाला सापडले?
४)घागर कोणी घासली?
५)घुमा कोठे पडली?
६)वर प्रत्त्यय लावून पाच शब्द लिहा. जसे:पाटावर.
७)घ या अक्षरांने सुरू होणारे शब्द लिहा.
[10/30, 6:28 PM] +91 95278 07568: घ घा उतारा
रात्रीच्या घनघोर अंधारात जंगलाच्या बाजूला असलेल्या झोपडीत घननील घोरत झोपला होता.अचानक घंटेच्या घनघण आवाजाने त्याची झोप मोड झाली.त्याने इकडे तिकडे बघितले.त्याला दूरवर घंटेचा आवाज येत आहे,हे जाणवले.त्याने काठीवर लटकलेले घोंगडे खांद्यावर घेत,एक हाती काठी व दुसऱ्या हाती कंदील घेऊन आवाजाच्या दिशेने निघाला.घनदाट जंगलातून टोकांडीलाच्या प्रकाशाने जंगलाच्या पलीकडे पोहचला.त्याला दिसले कि,घृणेश्वर मंदिरात एक वाट चुकलेला व्यक्ति मदतीसाठी घंटा वाजवत होता. घननील त्याच्याजवळ जाऊन त्याला आपल्या झोपडीत आणले. घटकभराने घोटभर चहा देत त्याला आरामकरिता दोन घोंगडी दिल्या.दोघेही शांततेत झोपी गेले.
उताऱ्यावर आधारित प्रश्न
1) घननीलची झोपडी कोठे होती?
2) घननील कसा झोपला होता?
3) जंगलाच्या पलीकडे कशाचे मंदिर होते?
4) मंदिरातून कशाचा आवाज येत होता?
[10/31, 8:56 AM] शिला ताई: उतारा क्र 6
अक्षर च चा
चारुलता नावाची एक चतुर मुलगी होती. चरण तिला 'चारु' म्हणयचा. चारुला चवदार चवळी आणि चाकवत आवडायचे .तिच्या नाकातील चमकदार चमकी चांदणीसारखी चमचम चमकायची . तिला चाफा आणि चातक खुपच आवडत .चारुच्या गालावर चामखीळ होती.चारु चांदीच्या चमच्याने चाकवतची चटकदार चटणी चमच्याने चाटून चाटून खायची .
प्रश्न
💥चारुलता कशी मुलगी होती?
💥चरण चारुलताला काय म्हणायचा?
💥चरण 'चारु 'कोणाला म्हणायचा?
💥चारुला काय आवडायचे ?
💥चमकी कशी चमकायची?
💥चारुला कोणते फूल आवडायचे?
💥चारुला कोणता पक्षी आवडायचा?
💥चारुच्या गालावर काय होते?
💥चामखीळ कोठे होती?
💥चारु चमच्याने काय खायची?
💥विशेष माहिती सांगणारा शब्द लिहा=1 चवळी
2 चटणी
3 चारुलता
4 चमकदार
💥उताऱ्यात आलेली भाज्यांची नावे लिहा .
➖➖➖➖➖➖➖➖
✏लेखन /शब्दांकन✏
श्रीमती अम्भुरे शिला किशनराव
जालना
[10/31, 3:27 PM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर च चा*
चेतना व चंद्रकांत चाळीसगावच्या चाळीत मामाच्या गावाला गेले होते. तेथे चंद्रकला मामी व चेतन मामांनी त्यांना चांदीच्या ताटात चवदार व चटपटीत चटणी, चिवडा, चकल्या व चांदीचा चषक, चमचा दिला. त्यानंतर त्यांना चटईवर चादर अंथरून चहा व चिकू खायला दिले. चौकस चंद्रकांत व चाणाक्ष चेतना चरखावर सूत कातायला गेले. चंचला चौरसी चौकटीतून पाहत होती. तिने चंद्रकांतला कपाळावर चंदनाचा टिळा लावला. चिंचेच्या झाडावर चातक, चिमणी, चंडोल व इतर चौदा पक्षी चैन करत होती.
*खालील प्रश्नांची उत्तरे द्या*
१)चाळीसगावाला कोण गेले होते?
२)चेतनाच्या मामा व मामीचे नांव सांगा?
३)चेतना व चंद्रकांतला कोणकोणते खाऊ खायला मिळाले?
४)सूत कशावर काततात?
५)चंचलाने कशाचा टिळा लावला?
६)चिंचेच्या झाडावर कोणते पक्षी होते व किती होते?
७)वर्णन करा. सुट्टीतील तुम्ही केलेली मजा.
*सुनंदा पाटील बोरविहीर ता.जि.धुळे*
[10/31, 4:55 PM] सुचिता कुलकर्णी मॅम: 🐣 *चतुर चिमणा चिमणी*🐣
🐣🐣🐣🐣🐣🐣🐣🐣
एक चिंचेच्या झाडावर चिमणा, चिमणीचे छान जोडपे राहायचा.चिमणा, चिमणीची चिटूकली चुणचुणीत दोन चिमुकली पिल्लं होती. चिमणा चिमणी सकाळीच त्यांना चांगले समजावून जंगलात चारा पाणी आणायला जायचे. चिमणा,चिमणी आपल्या पिल्लांना लांबून चारा, तांदळाचे दाणे , खाऊ चोचीत आणायचे
"बाळांनो आम्ही घरी येऊ पर्यंत घरट्याचे दार उघडू नका हं
तुम्हाला उडताही येत नाही काळजी घ्या हं माझ्या पिलांनो.
पिल्लं म्हणाली, "हो ग आई आम्ही शहाण्या बाळासारखे वागतो." शहाणी पिल्लं ती चिमणा चिमणी शिकवतील तसे शिकू लागले. चारा कसा खावा , चोंचीने दाणा टिपणे, हळूहळू उडायला शिकू लागले.
एके दिवशी भलामोठा साप झाडाच्या ढोलीत बसून रोज पिल्लांना पाहायचा.
साप हळूहळू घरट्याच्या दिशेने येताच चतुर चिमणी, धाडसी चिमणा, चुणचुणीत पिल्लांनी चोंचीने टोचून टोचून चांगलेच चोपले अशापद्धतीने सापाची चांगलीच खोड मोडली.
पिलांनाही एकीच्या बळाचा चांगला बोध झाला.
उतारा समजपूर्वक वाचा प्रश्नांची उत्तरे लिहा
👉🏾चिंचेच्या झाडावर कोणाचे घरटे होते?
👉🏾चिमणा चिमणी ला किती पिल्लं होती?
👉🏾 चिमणा चिमणी पिल्लांना काय शिकवायचे?
👉🏾झाडाच्या ढोलीत कोण होते?
👉🏾सापाची खोड कशी मोडली?
👉🏾लिंग बदला
जसे
चिमणा–चिमणी
✍🏻गाय–
✍🏻मुलगा–
✍🏻आई–
👉🏾वाक्यात उपयोग करा
✍🏻खोड मोडणे
👉🏾म्हण पूर्ण करा
एकीचे बळ............
👉🏾 चिमणा चिमणी,ची चित्रे काढा
✍🏻 *$$$सुचिता कुलकर्णी$$$*
*जि.प.प्रा.शा.पाटोदा*
*ता.परतूर.जि.जालना*
[10/31, 6:15 PM] +91 99604 68394: *उतारालेखन **
*परिस्थिती वर मात*
चाळीसगाव च्या चरण काकांची नोकरी गेली तरी , न डगमगता त्यांनी चाफेकर चाळीत चहाची व भजी नाश्ता ची हातगाडी लावली.
चवदार, चमचमीत, चटकदार भजी, चविष्ट, चटपटीत चटणी व गरमागरम चहा पिण्यासाठी लोक चोपड़ावरुन पण यायचे.
काका चहा करताना त्यात ताजा ताजा गवतीचहा टाकायचे, त्यामुळे चहा चांगलाच चटकदार व्हायचा. काका दिवसभरात चार हजार चारशे चाळीस रुपयांपर्यंत कमाई करायचे. त्यांची नजर चातकासारखी चाणाक्ष होती.
काकांच्या अंगी स्वच्छता पण होती, आजूबाजूला त्यांनी चाफ्याची झाडे लावली होती, चवळीचे वेल पेरलेले होते.
अश्याप्रकारे काकांनी न डगमगता परिस्थितिवर मात केली.
प्रश्न 1. खालती प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) काकांनी हातगाडी कोठे लावली.?
ब) काकांनी आजुबाजुला कशाची झाडे लावली आहेत?
क) काकांची कमाई किती पर्यंत व्हायची?
प्रश्न 2 च या अक्षराचे शब्द तयार करा?
प्रश्न 3 डोके चालवा.
तुम्हाला माहित असलेले चटणीचे प्रकार सांगा व लिहा?
प्रश्न 4 शब्द कोडे सोडवा.
नाजूक सोज्ज्वळ हिरवीगार छान,
वेलीवर मी शोभुन दिसते टवटवीत छान,
शेंग म्हणून मला, दिला
मान छान
ओळखा पाहू मी कोण.
*चवळी **
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय, उल्हासनगर 4, तालुका उल्हासनगर, जि ठाणे.
[10/31, 6:22 PM] +91 98235 82116: 🌲उतारा अक्षर च,चा 🌲
चमनचाचा चंपाचाचीबरोबर चमनबागेत फिरायला गेले. तिथे त्यांनी चंपा चमेलीची फुले पाहिली.
चिंचेच्या झाडावरील चिंचा पाडल्या. चंदन व चेतनासाठी पिशवीत ठेवून दिल्या.
चमनबागेत त्यांना चंद्रकलातिई भेटल्या.तेथील चंपाअरण्याची प्रतीकृती पाहिली.
तिघांनी मिळून चमचमीत,चटकदार, चवीष्ट भेळ ,पाणीपुरीचा आस्वाद घेतला.
चंद्रकलाताईंनी आणलेली चकली फस्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖
...... प्रश्नउत्तरे....
१)चमनचाचा कोणत्या बागेत गेले होते?
2)भेळ ,पाणीपुरी कशी होती?
3) बागेत त्यांना कोण भेटले?
४) समान अर्थी शब्द लिहा.
अ) बाग
आ) बरोबर
५)उतार्यात आलेली फुलांची नावे सांगा.
६) भेळ ,पाणीपुरी सारखी चमचमीत पदार्थांची नावे सांगा.
७) नावे लिहा.
अ) सुवासिक फुले
आ) सावली देणारी झाडे.
इ) आंबट फळे
ई) गोड फळे.
➖➖➖➖➖➖➖➖
वसुधा नाईक
पुणे..
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
[10/31, 9:40 PM] +91 97680 69059: 🍁 उतारा अक्षर च चा 🍁
चंदु कुटूंबासह चमेली हाॅटेल मधे
जेवणासाठी गेला सोबत चंपा चंदा बाबा चंद्रशेखर आई चंद्रकला
मामा चंद्रभान मुलगा चंपकने
वेटरने ताटं चंबुत ठेवलेला चंपकने एका चमचा व चिमटा उचला आणी खिशात टाकला असेच एका एका करता 10 चमचे घेतले.
सकाळी आत्याने चीरकुटे चाॅकले चायनीज खायला दीली
चंपकने एका चमचाभर चायनीजी चाॅवल पीजर्यातील चीमनीला दीले चंदु चीमनीला चीरोटे टाकायला गेला तेव्हा 10 चमचे लक्ष्यात आले .
चुकून चुका चुकुनहि होणार नाही असे सवाॅच्या लक्षात आणूण दीले चुक मान्य झाली चंद्रशेखर आणि चंद्रभान चमेलीमध्ये चमचे परत केले .
* खालील प्रश्नांची उत्तरे द्या .
1) चंद्रशेखर कुणाचे नाव होते ?
2) चंदुबरोबर कोण होते ?
3) आत्या कोणाची ?
4)चंद्रभान कोनी होता ?
5) चंपकने कोणती चुक केली ?7)पीजंर्यातील पक्षाचे नाव ?
* नाती सांगा :
🍁 आईच्या भावाला काय म्हणतात .
🍁मामाच्या बहीनीला .
🍁वडीलांचा भावाला .
* पु लिंग ओळखा:
🍁 आई ---
🍁 बहीण ---
🍁 काकु ---
🍁 चीमणी ---
लक्ष्मी ठाकरे
ठाणे म. न.पा शाळा
[10/31, 10:07 PM] +91 94239 37640: उतारा लेखन
च,चा
चमनदास चमकीलाल चवरे चणकापूरला राहत होते. तेथे चादनी चौकात त्याची चहाची व पानाची टपरी होती.चमनदासने दुकानावर चमकिल्या अक्षरांनी चहा ,पान हे नाव टाकले होते.चमनदाहने चमनबहार मसाला पण ठेवलेला होता.चंदू त्याचा मित्र रोज चमनबहार मसाला घेत असे.चंदूची बहीण चमेली पण रोज चंदूबरोबर येते.ती चहा पिते.चमनदासकडे चहा,व चमनबहार मसाला ,पान साठी खूप गर्दीच असते.सर्वच खूप आवडीने पान व चमनबहार मसाला खातात.चमनदासकडचे चटपटीत पान प्रसिद्ध आहे
प्रश्न
1चमनदास कुठे राहात होता .?
2 चमनदासचा व्यवसाय कोणता.?
वेळेअभावी प्रश्न अपूर्ण राहत आहेत
सौ कुमुद नेहेते
[11/1, 3:37 PM] +91 99604 68394: *उतारालेखन **
छाया व छगन छत्तीसगडला छबिलदास काळासोबत जत्रेला गेले, येताना त्यांनी छ्टाकभर खवा, रंगीत छटा असलेली छत्री आणली. सर्कस मध्ये सिंहाचा छावा बघितला.
जत्रेत त्यांनी छान छान छायाचित्रे काढली, छायाने छमछम वाजणारे चाळ घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सुद्धा आणली.
डोंबारा च्या मुलांचा छलांग मारण्याचा खेळ बघितला,व छोट्या छकुलीने लावलेला छुमछुम करणारा छल्ला छायाला आताही आठवतो.
बाबांना झाडांची छाटणी करताना ते खुप आनंदात जत्रेतील गमतीजमती सांगत होते.
_____________प्रश्न 1 खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) जत्रेला कोणासोबत मुले गेली होती?
ब) छायाने छमछम करणारे काय घेतले?
प्रश्न 2 तुम्ही पाहिलेल्या जत्रेचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा?
प्रश्न 3 छत्रीचे चित्र काढा व रंगवा.?
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय उल्हासनगर 4. तालुका- उल्हासनगर जि- ठाणे.
[11/1, 4:13 PM] शिला ताई: *उतारालेखन क्र 07*
*अक्षर छ छा*
छाया बिछान्यावर गाढ झोपली होती .झोपेत तिला स्वप्न पडले . ती एका छानशा छदामपुर नावाच्या गावात आली .त्या गावात अनेक छोट्या -मोठ्या छत्र्या होत्या .छायाने एक छानदार छत्री उचलली आणि छनछन असा आवाज आला .तिथेच तिला छटाकभर वजनाची छोटी पेटी दिसली .छायाने पेटी उघडून पाहिली .पेटीत चाळ होते .छायाने चाळ पायात घातले आणि चालायला लागली .चालताना छमछम असा छान आवाज येऊ लागला .पुढे तिला छबीला नावाचा मुलगा भेटला .त्याच्या हातात जादूची छडी होती .छडी फिरवून त्याने छायाला गायब केले .लगेच छाया दचकुन जागी झाली .
प्रश्न
👉🏿बिछान्यावर कोण झोपले होते ?
👉🏿छाया कोठे झोपली होती ?
👉🏿छाया कशी झोपली होती ?
👉🏿छाया कोणत्या गावाला आली ?
👉🏿छायाने काय उचलले ?
👉🏿छत्रीतून कसा आवाज आला ?
👉🏿पेटीचे वजन किती होते?
👉🏿पेटीत काय होते?
👉🏿छायाला कोण भेटले?
👉🏿छायाला भेटलेल्या मुलाचे नाव काय होते?
👉🏿छबिलाच्या हातात काय होते?
👉🏿छाया दचकुन का जागी झाली?
👉🏿तुम्हाला पडलेल्या स्वप्नाचे वर्णन करा .
➖➖➖➖➖➖➖➖
✏ लेखन /शब्दांकन✏
अम्भुरे एस के
जालना
वर्ग तिसरा
[11/1, 7:47 PM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर छ छा*
छगन व छाया छदामपूरला छकडाने गावाला गेले. तेथे त्यांनी छान छोटीशी छत्री घेतली. नंतर छकुलीने छोटेसे छायाचित्र काढले. छायाचित्रात छोटीशी बाहुली छडी काढली. छकुलीने छुमछूम छैया छैया छत्तीस वेळा नाच केला. तिने हा छोटासा छंद जपताना तिचा खूप छळ झाला. छकुलीने छिद्राची छान छपाई केली. छप्पन रुपयाला छप्पन छटाक साखर छोटूराम शेठच्या दुकानातून घेतली.
*खालील प्रश्नांची उत्तरे द्या*
१) छदामपूरला कोण गेले होते?
२)छदामपूरला कशाने गेले होते?
३)छायाचित्रात कोणकोणते चित्र काढले होते?
४)छकुलीने कसा नाच केला?
५)छकुलीने कोणता छंद जोपासला?
६)छकुलीने छपाई कशी केली?
७)छकुलीने साखर किती रूपयांची घेतली?
८)छकुलीने साखर किती छटाक घेतली?
*सुनंदा पाटील बोरविहीर ता.जि.धुळे*
[11/1, 7:53 PM] +91 98348 55094: उतारा लेखन
छ छा
छत्री
छत्री छान होती. छत्रीला विविध रंगाची छटा होती.छत्रीला वरती छान शेंडा होता. छत्री च्या शेंड्या ला छन छन वाजणारा गोंडा होता. छत्रीला एक आठ अंकाच्या आकारासारखा बाकदार छडी होती. छडीवर छगन नाव लिहीले होते. छगनची विविध रंगाच्यां छटांनी सजलेली छत्री छान दिसत होती.
प्रश्न
छत्री कशी दिसत होती.?
छत्रीला कशाची छटा होती?
छत्री च्या शेंडँला काय लावले
होते?
छत्रीचा गोंडा कसा वाजत होता?
छडीवर काय लिहिले होते?
वनमाला वंजारी
जि प यवतमाळ
[11/1, 10:12 PM] +91 97680 69059: 🍁 उतारा लेखन 🍁 🌷 अक्षर छ ,छा 🌷
छाया छबी छायंग छमा छबु छकुली छकुल छना छगन
मुलांनी वगाॅत छत्रपती शिवाजी महाराजांचा छानसा राज्याभिषेक
करण्याचे ठरवले.
छायाने एक बाकाचा छानसा
रायगड तरारले केला .छायांगने
छत्रंपतीचा पेहराव केला छबीने छान फुले फळं आणली.छमाने छानच दिव्याची आरती आणली.
छकुली जीजामाता छायांग छत्रपती शिवाजी महाराज छिलकत टाकलेल्या सिंहासनावर
विराजमान झाले.
छकुली आणी छबी दोन बाजूला
उभ्या राहिल्या छकुलीच्या हातात छानदार छटांनी सजवलेली छत्री छत्रपतीच्या डोक्यावर पकडली छननाने छनछन वाजणार्या मोहरा छान चांदी सोन मोहरा वाटण्यात आल्या.
छकुलने छबीलालच्या दुकानातुन
छानशी मीठाई छमकी आणली .वग॔ जीजा माता छत्रपती तो रायगड मावळे जणु काही सव॔ खरेच दीसत छानच छान.
* खालील प्रश्नांची उत्तरे द्या:
1.छत्रपतींचा राज्याभिषेक कुठे करण्याचे ठरवले ?
2. छत्रपती शिवाजी कोणी झाले ?
3.जीजाऊ कोण ?
4. गडाचे नाव सांगा ?
5. पात्रांमघ्ये कोण कोण सामील झाले ?
प्रश्न 2 रा -पात्रातील 'स्त्री ' लिंग ' ' पु ' लिंग ओळखा :
प्रश्न- चमकणार वस्तूची नावे सांगा :
प्रश्न- समानार्थी शब्दाचे अथ॔ सांगा:
1)छान = ----------
2) पेहराव = ---------
3) सिंहासन= -------
--------------- 🌹-----------------
लक्ष्मी ठाकरे
ठाणे म.न.पा. शाळा
[11/1, 10:13 PM] +91 94041 37398: *****************************
उतारा लेखन
छ छा
छत्तीसगडहून आलेल्या छकुली व छाया या दोघी बहिणी वर्गात चांगल्याच हुशार मुली.
या चाणाक्ष मुलींमुळे वर्गात चुळबुळ चालू झाली.
विद्यार्थीनींमध्ये चढाओढ सुरू झाली.प्रत्येक कार्यक्रमात मुली चटकन सहभागी होऊ लागल्या...गृहपाठ अभ्यास चटपट होऊ लागला .वर्गातील मुली छाया छकुलीचे छानदार अनुकरण करून चाणाक्ष बनू लागल्या. प्रत्येक उपक्रमात हा वर्ग चमकू लागला. छानछान बक्षिसे मिळवू लागला. त्यामुळे मु.अ.छबिलदास सरांनी वर्गाचे तसेच छकुलीछायाचे कौतुक केले.
प्र. छत्तीसगडहून आलेल्या मुलींची नावे लिहा?
प्र.छाया छकुली यांच्यातील नाते काय?
प्र.छाया छकुली यांच्यामुळे वर्गात काय बदल घडून आला ?
प्र.परिच्छेदात आलेली छ.व च . अक्षरांनी सुरूवात असलेले शब्द लिहून वाक्य बनवा?
-----'------'-------'------'------'-------'-------'
*ऋजुता महिन्द्रे*
*यवतमाळ*
******************************
[11/2, 11:51 AM] शिला ताई: उतारा क्र 09
अक्षर ज जा
माझे नाव जाई जयकुमार जाधव आहे .मी आज जळगावला जाणार आहे .जळगावला माझी जयाताई राहते .ती जलतरण पटू आहे .ती खुप जाड आहे तरीही जलद गतीने पोहते .जयाताई जहाजात बसून जलतरणासाठी जपानला जाणार आहे .तिला जाईच्या फुलांचा गजरा खुप आवडतो .जपानला जाताना आई तिला जवसाची चटणी आणि आजी जपमाळ देणार आहेत .जपानच्या जलतरणात जयाताईचा विजय झाला तर जगभरात जयाताईचा जयजयकार होईल .
प्रश्न
✏माझे नाव काय आहे ?
✏मी आज कोठे जाणार आहे ?
✏जळगावला कोण राहते?
✏जयाताई कुठे जाणार आहे ?
✏जयाताई जपानला का जाणार आहे ?
✏जयाताई कोणत्या वाहनाने जपानला जाणार आहे ?
✏जयाताईला कशाचा गजरा आवडतो?
✏आई आणि आजी जयाताईला काय देणार आहेत?
✏जयाताईचा जयजयकार केव्हा होईल ?
✏उलट अर्थाचे शब्द सांगा
1 आज 2 जाड
3 जलद 4 बसून
5 जाणार 6 माझे
✏वाहतुकीच्या साधनांची नावे सांगा.
✏तुम्हाला माहीत असलेल्या फुलांची नावे सांगा .
✏तुम्हाला माहीत असलेल्या पाच गावांची आणि पाच देशांची नावे सांगा
.➖➖➖➖➖➖➖➖
✏ लेखन /शब्दांकन✏
अम्भुरे एस. के .
जालना
वर्ग 1 /2
[11/2, 12:14 PM] +91 95033 74833: *--उतारा--*
*ज* *जा*
जयेश जळगावला जिजूकडे जेवायला जात होता.जिजूने जयेशला बोलवले होते.जातांना त्याला जगदिश बसमध्ये भेटला.जगदिश हा जयेशचा जवळचा बालमित्र होता.दोघही एकमेकांना विचारत होते,की तु कुठे आहे सध्या? तेव्हा जयेश म्हटला की मी जपानला आहे आणि तु कुठे आहे सध्या? तेव्हा जगदिश ने सांगितले की मी जर्मनीला आहे.दोघही गाडितून उतरले व एकमेकांना मिठी मारुन आपापल्यी मार्गाने जायला निघाले.
*--प्रश्न--*
१)जयेश कुठे जात होता?
२)जयेशला कोणी बोलवले?
३)त्याला गाडीत कोणता मित्र भेटला?
४)जगदिश सध्या कुठे होता?
५)जयेश कुठे कामाला होता?
*--निलेश पाटील,--*
*--पारोळा,जि-जळगाव--*
*--माध्यमिक विद्यालय,भवरखेडे.बु.||--*
*--ता-धरणगाव,जि-जळगाव--*
[11/2, 3:20 PM] +91 98235 82116: 🌺🌲उतारा लेखन 🌲🌺
अक्षर ज,जा
जया,जयेश,जितेंद्र,जनाबाई जाईल क्लासला जायला निघाले. रस्त्यात त्यांना जुगनू भेटला.
जाईल क्लासला सर्व मिळून निघाले. जाताना मधेच त्यांना जाई ,जुईचे झाड लागले. मुलांनी फुले वेचली.कंपासात नीट ठेवली.
क्लासला पोहोचल्यावर जुई बाईंना दिली .बाईंनी त्यांच्या आईला गजरा बनवायला सांगितला.बाईंनी तो केसात माळला.
➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्न उत्तरे
१)मुले कोणत्या क्लासला जात होती?
२) रस्त्यात मुलांना कशाचे झाड लागले?
३) गजरा कोणी केला?
४) गजरा कोणत्या फुलांचा केला?
५) किती मुले क्लासला होती?
६) मुलांनी फुले कशात ठेवली होती?
७ ) समान अर्थी शब्द लिहा.
अ) फुल—
आ) रस्ता—
८) उतार्यात आलेले जोडशब्द लिहा.
९) पांढर्या फुलांची नावे लिहा.
१०) उतार्यात एका संत महिलेचे नाव आले आहे ते लिहा.
➖➖➖➖➖➖➖➖
वसुधा नाईक
पुणे...
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
[11/2, 3:58 PM] +91 98348 55094: उतारा
ज, जा
माझे नाव जयेश जीवन जुमळे आहे. मी काल जबलपूर या गावी
आई व जान्हवी सोबत आजोळी गेलो. जान्हवी ही माझी छोटी बहिण आहे. आजोळी आजीने गुलाब जामुन व जीलेबी बनवली होती. घरातील सर्व जण एकत्र जेवायला बसले. जेवनात रंगत आली. भरपूर जेवन झाले.जयेश व जान्हवी जाम खूश झाले.
प्रश्न
जयेशचे पूर्ण नाव काय ?
जयेश च्या बहिणीचे नाव काय आहे?
जयेश व जान्हवी कोणत्या गावी गेले?
आजीने कोणते पदार्थ बनवले?
जयेश व जान्हवी आई सोबत कोठे गेले?
कु वनमाला गुलाब राव वंजारी
जि प यवतमाळ
[11/2, 5:15 PM] +91 86985 72401: *ज जा उतारा लेखन*
🖋🔖🖋🔖🖋🔖
जगन जायखेडा गावात राहत होता .जगनला दोन मुले होती जयवंत आणि जालंदर .जयवंत दररोज शेतात जास्तीत जास्त काम करायचा. आणि जालंदर फक्त जगातील घडलेल्या बातम्या सर्वांना सांगायचा.जगनने एक दिवस जवाहरला जनाताईची जलद गाडीने जाऊन भेट घेण्यास जाण्याचे ठरविले.दोघं मुलांना जवाहरला जाण्याची बातमी कळताच जतन केलेले गंगाजल जनाताईचस घेऊन जाण्याचे सांगितले .◆◆◆◆◆◆◆◆◆◆ एकूण १० गुण
प्रश्नांची उत्तरे सांगा?
३ गुण
प्रश्न--
१)जगनने कुठे जाण्याचे ठरविले?
२)गंगाजल कोणाला देण्यासाठी जतन केले होते?
३)जालंदर कोणते काम करत असे?
•••••••••••••••••••••••••
★रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.....२गुण
१)जालंदर जगातील घडलेल्या -------- सर्वांना सांगायचा.
२)जगन---------गावात राहात होता.._____________
★.विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा..... २गुण
१)जलद ×--------
२)दिवस×---------
★शेवटी वंत प्रत्यय लावून तीन शब्द लिहा..
३गुण
जसे -- जय- जयवंत
१)---------
२)---------
३)---------
*सौ माधुरी जाधव*
*मनपा शाळा उल्हासनगर जि ठाणे*
[11/2, 6:00 PM] +91 94207 75019: 🌸 उतारा लेखन🌸
अक्षर ज, जा
जानराव जानोरकर काका जळगावला जायला निघाले. जातांना जवळच्या जगणला सांगितले.जाता जाता जांबगाववरून जनकला सोबत घेतले. जान्हवीसाठी जाई, जुई, जास्वंदाची फूले विकत घेतली. जेवणाच्या डब्यात जवसाची चटणी घेतली. जाडजूड पांघरुण घेतले. जान्हवी ने जागरण करून जानराव काका व जनकची वाट पाहली.त्यांना पाहून जान्हवी जाम खूष झाली.त्यांना जांभूळ, जांब ही फळे खायला दिली.
**प्रश्न**
१) जानराव काकाचे आडनाव काय होते?
२)जांबगाववरून काकांनी कोणाला सोबत घेतले?
३)जेवणाच्या डब्यात काय होते?
४)जनकने कोणाची वाट पाहीली?
५)जान्हवी ने त्यांना खायला काय दिले?
**कु. अंजली मुळे**
पं.स.दारव्हा जि.यवतमाळ
[11/2, 6:50 PM] +91 94041 37398: ****************************
*उतारा लेखन*
*ज जा*
जयवंत जंजिरा किल्ल्याजवळील जाम गावी रहात होता. जयवंत छोट्या जहाजावर काम करायचा.ते जहाज जांभळ्या पांढय्रा रंगाचे सुंदर होते.
एकदा जयवंत आपल्या जागृती पत्नी व जान्हवी मुलीसह जहाजावर आला होता . तेव्हा त्या जहाजातून प्रवास करण्याकरिता देशाचे जवान आले होते. शिस्तीत जहाजात चढलेले जवान बघून जयवंत हरकून गेला. अभिमानाने मुलीला व पत्नीला व मुलीला म्हणाला," हे बघ आज माझ्या जीवनाचे सार्थक झाले.माझ्या देशाचे जवान आज जहाजावर ."
मुलगी जान्हवी एकदम ओरडलीच "जय जवान जय किसान." ऐकलेला जवान शब्द प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघून आनंदून गेली.जंजिरा जवळ आला जवान जहाजातून उतरले जंजिय्राकडे चालू लागले तेव्हा जयवंत ,जागृती व जान्हवी पाठमोय्रा जवानाकडे बघत *जयहिंद*करीत तशीच उभी होती.
प्र. जयवंत कोठे काम करीत होता?
प्र. जयवंतचे जहाज कसे होते?
प्र. जहाजातून प्रवास करण्याकरीता कोण आले होते?
प्र. जवानांना बघुन जान्हवीच्या तोंडून कोणते उद्गार बाहेर पडले?
प्र."जयजवान जय किसान" हा नारा कोणी दिला?
प्र.जंजिय्राला जलदूर्ग का म्हणतात?
प्र . वाक्य बनवा.
*जवान
* जहाज
* जंजिरा
*ऋजुता महिन्द्रे*
जि प शाळा सिंगद
यवतमाळ
वर्ग 5 वा.
********************************
[11/2, 7:21 PM] +91 99604 68394: *उतारालेखन **
*औषध **
जळगावच्या, जवळपास जामनेरला, श्री. जगन जगदीश जावळे, जळकू वरून, जगदाळे यांचेकडुन जवस आणतो. व जालनावरून, कवयित्री शिलाताई अंभुरे यांच्या वनराईतील जांभळे , जास्वंद फुले, जाईजुई पाने, जायफळ,इत्यादि वनस्पती, पान, फुल, फळे आणुन तो त्या पासुन औषध तयार करतो ते औषध जळजळ , जठराग्नी चे विकार, अनेक आजार यावर देतो, औषध बनवण्यासाठी शुदधजलाचा वापर केला जातो. जगदंबा कृपेने तो आयुर्वेदिक औषधिचा व्यवसाय करतो.
, जबलपुर, जमशेदपुर, तसेच जापान इथुन लोक त्यांच्याकडे औषध घ्यायला येतात.
_____________
प्रश्न 1 तुम्हाला माहित असलेल्या आयुर्वेदिक वनस्पतीची नावे लिहा?
प्रश्न 2' माझे आवडते फळ ' निबंध लिह?
प्रश्न 3' जांभूळ' या फळाचे चित्र काढा रंगवा?
प्रश्न 4 विचार करा
उतारा मध्ये एका जिल्हाचे नाव आले आहे त्या जिल्हाचे नाव सांगा?
प्रश्न 5 तुम्ही राहतात त्या जिल्हाचे नाव सांगा व शिक्षकांसोबत चर्चा करा.
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय उल्हासनगर 4. तालुका_ उल्हासनगर, जि_ ठाणे.
[11/2, 7:46 PM] +91 94207 75019: *ज जा उतारा लेखन*

[11/3, 11:56 AM] शिला ताई: उतारा क्र 10
अक्षर झ झा
🏛 *झपाटलेला वाडा* 🏛
गावाबाहेर एक वाडा होता .सारेजण त्याला झपाटलेला वाडा म्हणायचे . एक दिवस कुतुहलपोटी अझहर आणि झरिना तिथे गेले .वाड्याभोवती दाट झाडी होती .अंगणात फुलझाडे फळझाडे होती .वाड्याच्या मागे झरा झुळ झुळ वाहत होता .दोघेजण झटकन वाड्यात शिरले .वाड्यात खुप कचरा आणि धूळ जमा झाली होती .झरीनाने झाडूने सारा वाडा झाडून एका झटक्यात साफ़ केला.अझहरने झटकणीने धूळ झटकली .अझहरने झरोके उघडले .झरीनाने झारीने अंगणातल्या झाडांना पाणी घातले . दोघांनी मिळून सगळीकडचे दिवे लावले आणि झगमगाट झाला .झपाटलेला वाडा आता झकास दिसू लागला .
〰〰〰〰〰〰〰〰
प्रश्न
🏛गावाबाहेर कोणता वाडा होता
🏛वाड्यात कोणकोण गेले ?
🏛वाड्याच्या मागे काय होते ?
🏛वाड्याच्या अंगणात कोणती झाडे होती?
🏛वाडा कोणी झाड़ला?
🏛धूळ कोणी झटकली?
🏛झाडांना कोणी पाणी घेतले?
🏛लिंग ओळखा
अझहर झरीना
वाडा झाडू
झरा झटकणी
🏛तुम्ही तुमच्या घराची सफाई कशी करता ?
➖➖➖➖➖➖➖➖
✏ लेखन /शब्दांकन✏
🦋अम्भुरे एस के🦋
जालना
वर्ग 4 था
[11/3, 2:41 PM] +91 94041 37398: *****************************
*उतारा लेखन*
*झ झा*
झरिना व झारा झटकन उठल्या व झरझर चालू लागल्या. कारण त्या झपाटलेल्या वाड्यात खेळत होत्या.खेळत असतांना अचानक अझहर तेथे आला. झरिना व झाराला हा वाडा झपाटलेला आहे असे सांगताच त्या दोघी तेथून निघाल्या.घाबरलेल्या झारा व झरिनाला बघून झाडत असलेल्या झाकीरानी त्याची चौकशी केली.मुलींचे ऐकून झाकीरा मुलींना म्हणाली,"झपाटलेलं असं वगैरे काही नसतं,हे सर्व मनाचे खेळ असतात." झाकीराने झपाटलेल्या झाडूची गोष्ट सांगितली.
गोष्ट ऐकून मुलींच्या मनातील भिती निघून गेली.
परत झरिना व झारा आनंदाने खेळू लागल्या.
प्र.मुलींची नावे सांगा?
प्र.झारा व झरिना कोठे खेळत होत्या?
प्र.मुलींच्या मनातील भिती कोणी काढली?
प्र. वाढा झपाटलेला आहे हे मुलींना कोणी सांगितले?
प्र. वाक्य बनवा.
झपाटलेला.
झरझर
ऋजुता महिन्द्रे
यवतमाळ
वर्ग 5 वा
********************************
[11/3, 2:46 PM] +91 94216 18744: *उतारा लेखन अक्षर झ झा*
झुमरी व झालाबाईने झाडूने अंगण झरझर झाडले. त्यानंतर झाकिरने झोपडी बाहेर झेंडूचे झाड झकास लावले. झाडाला झारीने पाणी टाकले. झोपडी जवळून झरा खळखळ वाहत आहे. दुपारनंतर उन्हाच्या झळा लागत आहे. झुमरीने झाडाला जोराचा झटका दिला. झालाबाईने झोपडी कडे जोराची झेप घेऊन झडप घातली! झाकिरने झोपडी जवळच्याच झाडाला झोपाळा बांधून झुमरीला झोक्यावर बसवले. झुमरीने झकास झालर लावलेला झिरमिरीत झगा घातला. झोक्यावरून झुमरी व झाकीरचा झगडा झाला. झुमरी व झालाबाई झोपडी बाहेर झिम्मा खेळत होत्या.
*खालील प्रश्नांची उत्तरे द्या*
१)झाडूने काय झाडले?
२)झाकिरने कशाचे झाड लावले?
३)झाडाला कशाने पाणी टाकले?
४)झोपडी जवळून काय वाहत होता?
५)कशाच्या झळा लागत होत्या?
६)झोपडीकडे झडप कोणी घेतली?
७)झोक्यावर कोण बसले?
८)झुमरीचा झगा कसा होता?
९)खळखळ सारखे पाच शब्द लिहा.
*सुनंदा पाटील बोरविहीर ता.जि.धुळे*
[11/3, 6:22 PM] +91 94207 75019: 🌸उतारा लेखण🌸
अक्षर झ, झा
झाडगावच्या झालाबाईने झाडूने झरकन अंगण झाडले.झाडता झाडता पसारा आवरला. झारीने झाडाला पाणी दिले. झेंडूची फूले तोडली. झेंडूच्या फूलांची झकास रांगोळी काढली. दिव्यांच्या झगमगाट केला. झरीनाला झगा घालायला दिला.झालाबाईने झरीनाला झारयाने काढलेल्या चकल्या खायला दिल्या. झाकझूक करुन झालाबाई ,झरीना झोपी गेल्या.
**प्रश्न**
१)झालाबाईने अंगण कशाने झाडले?
२)झालाबाईच्या घराचे नाव काय होते?
३)झालाबाईने कशाची रांगोळी काढली?
४)झरीनाने काय खाल्ले?
५)कोणत्याही पाच फुलांची नावे सांगा?
**कु.अंजली मुळे**
पं.स.दारव्हा जि.यवतमाळ
[11/3, 6:37 PM] +91 99604 68394: *उतारालेखन **
*झकास **
झेलमवरून झिया आली म्हणून, झिझक झुबा, झिनत, झिपरी आम्ही सर्व झिपरूशेटच्या शेतात गेलो. जाताना झुमरीला सोबत घेतले. शेतात छान झुबकेदार, झुलणारी, फुलझाडे, व फळझाडे होती. बाजुला झुळझुळ वाहणारा झरा होता. आंब्याच्या झाडाखाली बसुन आईने झणझणीत झकास झुणका बनविला. सर्वांनी झटपट जेवण आटोपले. नंतर खालती झावर टाकुन झावरे काकांनी झपाटलेल्या वाड्याची गोष्ट सांगितली.
अधुन मधुन उन्हाची झळ लागत होती,
नंतर आम्ही झिलमेशच्या घरी झोक्यावर बसण्यासाठी गेलो . झिनतला रस्त्यावर येताना झट लागली म्हणून पायाला हळद लावली. झिलमेश चा भाऊ झंप्या झोळीत शांत झोपला होता त्याने झगमग झबले घातले होते. आम्ही खुप खेळलो नंतर झनझन मावशीने झाराने झारखंडवरून आणलेल्या
हदगाच्या पानांची भजी खायला दिली.कधी रात्र झाली कळल नाही. आम्ही अंगणात झगमगाट करणार्या आकाशाखाली झोपाळ्यात झोपुन गेलो.
त्या दिवसाला आम्ही झकास दिवस नाव दिले, व पुढील सुट्टीत झुमरीतिलैयाला सर्वांनी जायचे ठरवले व तसे डायरीत लिहून ठेवले.
प्रश्न 1 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) शेतात बनविलेल्या पदार्थाचे नाव सांगा?
ब) मुलांना पुढिल सुट्टीत कोठे जायचे आहे?
क) कोणाच्या शेतात गेले होते?
प्रश्न 2 खालील दिलेल्या शब्दांप्रमाणे शब्द बनवा?
जसे - झुणका भाकर
तसे -
प्रश्न 3 समानार्थी शब्द लिहा.
झाड- फुल -
वाडा- शेत-
झावर-
प्रश्न 4 - खाली दिलेल्या शब्दावरून उतारा लिहा.
झबले, झगा, झिनत.
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय उल्हासनगर 4, तालुका- उल्हासनगर, जि - ठाणे.
[11/3, 8:11 PM] Asif: झांशी या गावातील हि गोष्ट. झीनत नावाची एक गरीब होतकरू हुशार मूलगी राहत असे. ती एका झोपडीत आपल्या आई व भावासोबत राहत होती.
सकाळी उठून अंगणाची झाडलोट करीत.झाडाचा पडलेला पालापाचोळा गोळा करी. ती शाळेला झगा घालून जात असे.
तिला झांज खेळणे, झाडू मारणे, झुणका भाकर अशा अनेक गोष्टी मन लावून करायची. ती यात्रेतील झुल्यात आपल्या भावाला म्हणजेच अमनला बसवायची व अमनला झोपाळ्यात बसवून झोके द्यायची. आयुष्यात खूप मोठी झेप घ्यायची आहे हे तिचे स्वप्न आहे.
१)झीनत कोणत्या गावात राहयची?
२)झीनत कोणाकोणा सोबत राहयची?
३)झुल्यामध्ये कोणाला बसवायची?
४)झीनत कोणकोणती कामे करत?
५)भावाचे नाव काय ते लिहा?
६)विरूद्धार्थी शब्द लिहा.
१) श्रीमंत—————
२)महल——————
३)रात्री——————
४)महल——————
🌹आसिफ मौला शेख🌹
ज्ञान प्रबोधन विद्यालय
माशाळे नगर सोलापूर.
[11/4, 9:50 AM] +91 98235 82116: 🌲उतारा अक्षर त्र,त्रा 🌲
त्रिशा ,गायत्री,सुमित्रा तिघी सकाळी शाळेत पायी निघाल्या. शाळा कात्रजला होती. घरापासून दहा मिनिटे लागायची.
रस्त्यात त्यांच्या मागे एक पांढरा शुभ्र कुत्रा लागला.त्रयस्थ माणसाने ते पाहिले. त्याने कुत्र्याला पळवून लावले. मुलींनी त्यांचे आभार मानले.
मुलि सुखरूप शाळेत पोहोचल्या. समोरच त्यांना सुचित्रा बाई, सौमित्र सर दिसले मुलींनी दोघांना त्रिवार अभिवादन केले.
वर्गात गेल्यावर चित्रा, चैत्रालीने त्यांना त्रैमासिक दाखवले.त्यात त्रिशाचे बडबडगीत,त्रिवेणीची बालकथा ,गायत्रीची "सावत्र आई" कविता छापून आली होती.
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
प्रश्नउत्तरे
१)मुली कोणत्या शाळेत होत्या?
२)कुत्र्याच्या तावडीतून मुलींची सुटका कोणी केली?
३)शाळेत पोहोचल्यावर मुलींना समोर कोण दिसले?
४)त्रैमासिक जसे तीन महिन्यातून प्रसिद्ध होते तसे...
अ) पाक्षिक
आ)मासिक
कधी प्रसिद्ध होते?
५) वाक्यात उपयोग करा.
अ) अभिवादन करणे.
आ) सुटका करणे
६) पांढरा शुभ्र तसे
अ) पिवळा-
आ) लाल-
इ )काळा-
७) थोडक्यात उत्तर लिहा.
अ) त्रैमासिकात कोणाकोणाचे कोणकोणते लेख छापून आले होते?
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
वसुधा नाईक
पुणे...
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
[11/4, 3:41 PM] +91 99604 68394: मंत्रालया जवळच्या, त्रिवेणी चौकात गायत्री देवीच्या मंदिरात गायञी मंत्रजपाचे पाच दिवस पारायणं सत्र ठेवले होते. त्यात अनेक स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या. सर्वाना मध्यंतरात खा. त्रंबक त्रिभुवन त्रिभुज मंत्री साहेब, अल्पोपाहार संत्री द्यायचे. त्रिपुरा त्रिपाठी विद्यालयातर्फे शिक्षिका चित्रा व नेत्रा यांनी पाच दिवस संध्याकाळी सर्वाना हळदीकुंकू देऊन छत्री, कात्री, अत्रेचे पुस्तक, सावित्रीच्या लेकी पुस्तक, पत्रावळी अशा भेटवस्तू द्यायच्या, नंतर सर्व आल्हाददायक वाजंत्रीचे स्वर ऐकत छत्रपतीचे पोवाडा ऐकायचे. स्वच्छतेच्या सुचना देणारे यंत्र बाहेर होते, नवीन तंत्रज्ञान, यंत्रणा बघुन सर्वाना आश्चर्य वाटायचे.
पाच दिवसाचे सत्र कुणालाही त्रास न होता व त्राण न येता छान पार पडले. पत्रकारांनी कार्यक्रमाची छायाचित्र काढून वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली, तसेच पुढील कार्यक्रम कात्रज ला खात्रीपूर्वक करण्याचे ठरविले.

1 मंत्रजप कोणत्या मंत्राचा होणार आहे?
2 पाच दिवस भेटवस्तू कोणी दिल्या?
3 संत्री वाटप कोणी केले
प्रश्न 2 तुम्हाला माहित असलेल्या समाजसेवकांची यादी तयार करा?
प्रश्न 3 'संत्री' या फळाचे चित्र काढा व रंगवा.
*करून तर बघा*
तुम्ही तुमच्या परिसरातील पत्रकार दादाची मुलाकात शिक्षकांच्या मदतीने घ्या.व त्यांचा शाळेत सत्कार करा.
सौ. कुंदा विकास झोपे. नवोदित विद्यालय. उल्हासनगर 4. तालुका- उल्हासनगर जि - ठाणे.
[11/4, 4:20 PM] +91 94207 75019: 🌸उतारा लेखण🌸
अक्षर त्र,त्रा
त्रिशा, त्रिवेणी, त्रिलोकेश त्र्यंबकेश्वरला जत्रेला गेले.सर्वत्र गर्दी खूप होती.
जत्रेमध्ये त्यांनी त्रिदेवाचे चित्र विकत घेतले. त्रिपालसाठी खेळण्यातला कुत्रा घेतला. त्रिकोणी आकाराची छोटी पिशवी घेतली. जत्रेमध्ये त्रिलोकेशचा मित्र भेटला. खायसाठी संत्री घेतली. एका त्रयस्थ माणसाने त्राटकाविषयी माहिती सांगितली. त्रिशाला फिरायचा त्रास आला.सर्वजण एकत्र घरी परत आले. त्रिवेणीने जत्रेचे चित्र चित्रकलेच्या वहीमध्ये रेखाटले. तसेच चित्रवर्णन लिहून काढले.
***प्रश्न***
१)मुले जत्रेला कोणत्या गावाला गेले होते?
२)जत्रेमधून कशाचे चित्र विकत घेतले?
३)त्रिपालसाठी जत्रेमधून काय घेतले?
४)त्रिवेणीने कशाचे चित्र रेखाटले?
५)जत्रेमध्ये मुलांना कोण भेटले?
६)तुम्ही पाहिलेल्या जत्रेचे वर्णन थोडक्यात करा?
७)वचन ओळखा व लिहा.
अ)चित्र -------
आ)मित्र -------
इ)कुत्रा -------
ई)संत्री -------
**कु.अंजली मुळे**
पं.स.दारव्हा जि.यवतमाळ
[11/4, 7:21 PM] +91 98348 55094: आजचा उतारा
त्र त्रा
चित्रा व गायत्री त्रिशूल चित्रपट बघायला गेल्या. चित्रपट शो रात्रीचा असल्याने घरी यायला
रात्रीचे नवू वाजले. त्रिशरन घरी
एकटाच असल्याने बोर झाला म्हणून त्यानं चित्रकलेची वही काढली व चित्र काढत बसला. व चित्रात रंग भरत बसला. चित्र कात्रीचे काढले होते. चित्र बघून
चित्रा व गायत्री मंत्रमुग्ध झाल्या.
व त्रिशरन ला त्रिवार अभिवादन केले. त्रिशरन ने कात्रीचे चित्र कात्रीने कचकच कापून कात्रण काढले व चित्र संग्रहवहित कात्रण
जपून ठेवले.
प्रश्न
चित्रा व गायत्री कोठे गेल्या होत्या ?
चित्रा व गायत्रीने कोणता चित्रपट पाहिला?
चित्रपट शोची वेळ कोणती होती?
त्रिशरन ने कशाचे चित्र काढले होते?
.त्रिशरन ने चित्र कशाने कापले?
त्रिशरन ने चित्र कशात जपून ठेवले?
कु वनमाला गुलाबराव वंजारी
प्रा शाळा बरबडा

No comments:
Post a Comment